Jalgaon : बनावट दारू बनवणाऱ्या व्यक्तीच्या घरावर छापा

Illicit liquor: 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
fake liquor raid
जितेंद्र वैद्यनाथ भाटpudhari photo
Published on
Updated on

जळगाव : शहरातील कंजरवाडा परिसरातील नवल नगर या ठिकाणी घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी नकली दारू तयार करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यात आला. यामध्ये 67 देशी विदेशी दारूच्या भरलेल्या बाटल्या मिळून आल्या. या छाप्यामध्ये 84 हजाराचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कंजरवाडा परिसर नवल नगर जळगाव येथे जितेंद्र वैद्यनाथ भाट (वय 55) हा त्याच्या घराच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी नकली दारू करीत आहे याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्याप्रमाणे 5 रोजी मध्यरात्री 01.30 वाजता छापा मारून जितेंद्र वैद्यनाथ भाट हा बनावट दारू तयार करीत असताना मिळून आला .

स्थानिक गुन्हे शाखेने 84 हजाराचा मुद्देमाल जप्त केला

त्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या भरलेल्या बाटल्या व खाली बाटल्या मिळून आल्या. तो बनावट दारू तयार करत असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळ टॅंगो पंच देशी 38 नग बाटल्या, मॅकडॉल कंपनीच्या 15 नग व रॉयल स्टॅग कंपनीच्या 14 नग विदेशी दारूच्या बाटल्या अशा तयार नकली दारूच्या बाटल्या , बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व विविध कंपनीच्या 2500 नग मोकळ्या दारूच्या बाटल्या व बाटल्यांचे बूच असे मिळून आले होते . या छाप्यात स्थानिक गुन्हे शाखेने 84 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही बनावट दारू मानवी जीवितास अपायकारक असल्याने व घातक रसायना द्वारे ही बनावट दारू तयार करत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. यादरम्यान त्याने रसायन कुठून आणले व बनावट दारू कोणाला विक्री करणार होता व करीत होता याची माहिती घेण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड , पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे राजेंद्र उगले, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रमोद ठाकूर, महिला पोलीस कर्मचारी रूपाली खरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news