जळगाव : सागर लॉजवर धाड; सहा महिला, एक पुरुष अटकेत

Sagar Lodge raid: हॉटेल मालक फरार
Jalgaon Crime
(File Photo)
Published on
Updated on

जळगाव : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू आहे. त्या ठिकाणी धाड टाकली असता सहा महिला व एक पुरुषाला अटक करण्यात आली आहे. तर हॉटेल मालक हा फरार झालेला आहे .या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशन, ०६ रोजी पोलीस निरीक्षक, संदिप पाटील यांना गुप्त मिळाली की सागर हॉटेल व लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत आहे. पोलीस स्टेशनला हजर असलेले राहुल तायडे,दत्तात्रय बडगुजर, राजेंद्र कांडेकर, मपोहेको सुनंदा तेली, इम्मान बेग, तुषार गिरासे, राहुल घेटे, छगन तायडे असे व दोन पंच यांना त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. एक डमी ग्राहक बोलावून त्याला सागर लॉज येथे पाठविले. सागर लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्याने सागर लॉज येथे दुपारी छापा टाकण्यात आला. तेथून ०६ महिला , ०१ ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुनाल एकनाथ येरापले (वय २५ रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले.

हॉटेल मॅनेजरला लॉजच्या मालका बाबत विचारणा केली असता त्याने लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉज मध्ये वेश्या व्यवसाय करीता बाहेरुन महिलांना बोलावून लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालवितात असे मॅनेजरने सांगितले . हॉटेल मॅनेजरला अटक केली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार झाला आहे. या पिडीत महिलांची वैदयकिय तपासणी करुन त्यांना आशादिप वस्तीगृह जळगाव येथे दाखल केले आहे. सागर लॉजच्या मालक व मॅनेजर विरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news