Rabbi Season Jalgaon | ज्वारीला विसरले, गव्हावर फिदा! जळगावच्या शिवारात 'भाकरी' हद्दपार; 'चपाती'ची चलती

रब्बी हंगामात जिल्ह्याचा 'पॅटर्न' बदलला; चाळीसगाव-अंमळनेरात ज्वारीत घट, धरणगाव, एरंडोलमध्ये गव्हाचे पिकांत वाढ
Wheat Cropping
Wheat CroppingPudhari
Published on
Updated on

Cropping pattern change Jalgaon

जळगाव : रब्बी हंगाम २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये जळगाव जिल्ह्यात पीकपद्धतीत लक्षणीय बदल दिसून आला आहे. पारंपरिक अन्नपीक म्हणून ओळख असलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असून गव्हाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. बदलती खाद्यसंस्कृती, गव्हाला मिळणारा हमीभाव आणि सिंचन सुविधांतील सुधारणा यामुळे शेतकऱ्यांचा कल गव्हाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याचा एकूण कल

जिल्ह्यात ज्वारीचे एकूण क्षेत्र १२८ वरून ११२ पर्यंत घसरले आहे (–१६), तर गव्हाचे क्षेत्र ९९ वरून १२३ पर्यंत वाढले आहे (+२४). यावरून शेतकरी बाजारपेठेचा अंदाज घेत पीकनियोजन करत असल्याचे दिसते.

Wheat Cropping
jalgaon crime news | हिंगोण्यात खळबळ: मैत्रीच्या वादातून तरुणाची हत्या

गव्हाची सरशी असलेले तालुके

  • धरणगाव : गव्हाचे क्षेत्र १०६ वरून थेट १६४ पर्यंत वाढले. ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ मानली जाते.

  • एरंडोल : १०९ वरून १५८ पर्यंत झेप घेत मोठी वाढ नोंदवली.

  • भुसावळ : ९४ वरून १३५ पर्यंत वाढ.

  • जामनेर व पाचोरा : या भागांतही गव्हाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

  • जळगाव तालुका : १२१ वरून १३५ पर्यंत वाढ.

ज्वारीची पिछेहाट

  • चाळीसगाव : सर्वाधिक घट येथे झाली. २०२४-२५ मध्ये ५३७ वर असलेले ज्वारीचे क्षेत्र २०२५-२६ मध्ये ११९ वर आले. ही मोठी घसरण मानली जाते.

  • अंमळनेर : ११८ वरून ६९ पर्यंत घट.

  • भुसावळ : १३५ वरून ८९ पर्यंत कमी.

  • जिल्हास्तरावर : एकूण १६ ने घट.

अपवादात्मक चित्र

  • भडगाव : येथे ज्वारीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली असून गव्हाचे क्षेत्रही वाढले आहे.

  • मुक्ताईनगर : मागील वर्षी ज्वारीचे क्षेत्र शून्य असताना यंदा ते १३२ वर पोहोचले आहे.

  • धरणगाव : ज्वारीतही ९३ वरून १२० पर्यंत वाढ दिसून आली आहे.

  • एरंडोल : ज्वारीचे क्षेत्र जवळपास स्थिर (७२ वरून ७०).

Wheat Cropping
Jalgaon Accident | पाळधी-तरसोद बायपासवर कंटेनर उलटला: ५ वाहने एकमेकांवर धडकली; गाड्यांचा चक्काचूर, काचांचा खच

तालुकानिहाय तुलनात्मक स्थिती (२०२४-२५ विरुद्ध २०२५-२६)

  • जळगाव : ज्वारी १०६→१०८ (अल्प वाढ), गहू १२१→१३५ (वाढ)

  • भुसावळ : ज्वारी १३५→८९ (घट), गहू ९४→१३५ (वाढ)

  • चाळीसगाव : ज्वारी ५३७→११९ (मोठी घट), गहू १५०→९८ (घट)

  • धरणगाव : ज्वारी ९३→१२० (वाढ), गहू १०६→१६४ (मोठी वाढ)

  • एरंडोल : ज्वारी ७२→७० (स्थिर), गहू १०९→१५८ (मोठी वाढ)

  • एकूण जिल्हा : ज्वारी १२८→११२ (–१६), गहू ९९→१२३ (+२४)

बदलत्या शिवाराची दिशा

एकेकाळी ग्रामीण भागात भाकरीसाठी ज्वारीचे महत्त्व होते; मात्र आता चपातीसाठी गव्हाची मागणी वाढल्याने शेतकरीही त्या दिशेने वळत आहेत. बाजारपेठेचा कल, हमीभाव आणि सिंचन सुविधांमुळे गव्हाची लागवड वाढत असून, जळगाव जिल्ह्याचा रब्बी पॅटर्न स्पष्टपणे बदलताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news