जळगांव : मानराज पाक जवळ झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा जीव गेला. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व रस्त्यांच्या देखभालीसाठी आज जळगावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खोटे नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी चालून आंदोलन केले. न्हाईचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शहात २८ रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क जवळ एक मोठा अपघात झाला. त्या अपघातात शहरातील दोन भगिनींना आपला जीव गमवावा लागला. अतिशय भीषण अपघात झाला होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी व त्या ठिकाणची माहिती घेतल्यानंतर लक्षात आले आहे. खड्डयांमुळेच हा अपघात झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
अशा प्रकारचे अनेक अपघात जळगाव शहरात मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे, रस्ता ना-दूरुस्तीमुळे नियमित होत आहेत. यापूर्वीही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे व काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. परिणामी मृत व्यक्तींच्या व अपघातग्रस्त कुटुंबीयांना अनंत अडचणींना पुढे सामोरे जावे लागते. अशावर तातडीने कार्यवाही व योग्य उपाय योजना करावी. आम्ही जळगावकर नागरिकानी जन आक्रोष मोर्चाद्वारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिलावर्ग हा खोटे नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय हे अंतर पायी चालून आले .
१) अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवारास तत्काळ नुकसान भरपाई मिळावी.
२) रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तीन दिवसाच्या आत जर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर आम्ही रस्ता पूर्णपणे खोदून टाकू व वापरण्यास बंदी करू.
३) या खड्ड्यांमुळे व ना-दुरुस्त रस्त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूला संबंधित कॉन्ट्रक्टर, ठेकेदार व NAHI विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
४) रस्त्यावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात यावीत.
५) रस्त्याचे काम कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या वेळेस कॉन्क्टर अनुभवी आहे की नाही आणि काम चांगल्या प्रतीचे व्हावे यावर विशेष समितीद्वारे लक्ष देण्यात यावे.
आमच्या वरील सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात आणि लवकरात लवकर जळगांव शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे व्हावीत, अशी मागणी आंदोलक जळगावकरांनी केली.
यावेळी, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, गजानन मालपुरे, दुबार भगरान सावेत संभाजी ब्रिगेड - जिल्हाध्यक्ष, गिनूताई इगाळे, बानी ते बिमल, सरल्ला खाणी,पार्वताबाई भिल सावळे,उज्ज्वला ताई पायल कातिल, पियुष संजयकुमार बांबी आदि उपस्थित होते.