

जळगाव : बांगलादेश येथे हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच हिंदू मंदिरांची तोडफोड, महिलांविरोधात संतापजनक कृत्य या विरोधात मंगळवार (दि,10) रोजी मानवाधिकार दिनानिमित्त भुसावळ शहरातील सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मंगळवार (दि,10) रोजी सकाळी दहा वाजता हिंदू पुरुष व महिलांचा विराट मोर्चा महाराणा प्रताप चौक वसंत टॉकीज येथून सुरू होऊन वसंत टॉकीज तहसील कार्यालय, गुरुद्वारा टेक्निकल हायस्कूल या मार्गे प्रांताधिकार्यालय येथे आल्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रांतधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये विविध धर्मगुरूंनी हिंदू समाजाला मार्गदर्शन केले. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. सकल साधू संतातर्फे यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा शांततेने पार पडला. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी भुसावळ शहरातील समस्त हिंदुत्ववादी जनता सहभागी झाली.