जळगाव : भुमापन कार्यालयातील खाजगी इसम लाच घेताना रंगेहाथ अटक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक
Nashik Crime News
भुमापन कार्यालयातील खाजगी इसमास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. File News
Published on
Updated on

जळगाव : आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्यासाठी भूमापन अधिकारी कार्यालयातील खाजगी इसम यांनी तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्यासाठी नमुद खाजगी इसम अविनाश सदाशिव सनंसे (वय 49 वर्षे, व्यवसाय- खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय, जळगाव) यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून काम करुन आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी 15000 व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी 1500 रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 1000 रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली. त्याच्या विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, राकेश दुसाणे, अमोल सुर्यवंशी हे करीत आहे. याद्वारे सर्व नागरीकांनी त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news