Jalgaon Politics | रोहिणी खडसेंच्या मतदारसंघात रुपाली चाकणकरांचे शक्तीप्रदर्शन

रविंद्र पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण
Rupali Chakankar's meeting with Ravindra Patil
रविंद्र पाटील यांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

जळगांव : विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी अनेक राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवामुळे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या यांना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांची भेट घेऊन भविष्यात रवींद्र भैया हे अजित पवार गटाकडे जाऊ शकतात असे संकेतच दिले आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे. तर रोहिणी खडसेंच्या बालेकिल्ल्यात त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळेस त्यांच्याबरोबर शिंदे गटात गेलेले आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते.

शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. खडसेंच्या बालेकिल्ल्यात रूपाली चाकणकर यांनी पायी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांचे भव्य स्वागत केले. त्यांच्यासोबत ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या जोरावर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील निवडून येऊन आज शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा चंद्रकांत पाटलांबरोबर असल्याचे चित्र या शक्ती प्रदर्शनातून दाखविण्यात आले आहे.

लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा रावेर लोकसभेत पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या मुक्ताईनगरला आल्या असताना त्यांनी मुक्ताईची आरती केली त्यानंतर चाकणकर यांनी रवींद्र पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांत काय राजकीय चर्चा झाली याबाबत समजू शकले नसले तरी मात्र या भेटीने भविष्यातील राजकारणात बदल होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या भेटीनंतर राजकीय चर्चांना जिल्ह्यात उधाण आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news