

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या जामनेर मुक्ताईनगर येथील राजकारणाच्या घडामोडींवरून लक्षवेधी ठरत आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड येथील नगरपालिकेमधील 6 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजे आमदार एकनाथ खडसे समर्थकांपैकी 4 नगरसेवकांनी शरद पवार गटाला रामराम करीत शिवसेना शिंदे गटात व भाजप गटात प्रवेश केला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये एकनाथ खडसे व विद्यमान आमदार यांच्यातील सौख्यपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यात जामनेरकर व खडसे यांचे सौख्यपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि पाहत आहे. या दोन नेत्यांचे एकनाथ खडसे यांच्या बद्दलचे वैर देखील सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीतही बोदवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी 17 जागांपैकी नऊ जागा शिंदे गटाने, 7 जागा राष्ट्रवादी म्हणजे एकनाथ खडसे समर्थकांनी विजय मिळविला होता. भाजपाला सार्वत्रिक निवडणुकीत बोदवड नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला होता. यावेळी त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
यामध्ये राष्ट्रवादीचे एका नगरसेविकेचा मृत्यू झाल्याने पोटनिवडणूक लागली होती. तेथे अपक्ष महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ एक संख्येने कमी झाले होते. यावेळी 6 उमेदवार खडसे समर्थक बोदवडनगर परिषदेमध्ये होते तर आता या सहापैकी 4 नगरसेवकांनी शिंदे सेना गटात थेट प्रवेश केला आहे तर एका नगरसेविकेने स्वतः त्यांच्या नातेवाईकांचा पक्षांतर घडवून आणलेले आहे.
यामध्ये कडू सिंग पाटील, योगिता खेवलकर, पूजा पारधी या नगरसेविकांसह काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष उषा पाटील, माजी स्वीकृत नगरसेविका डॉक्टर सुधीर पाटील यांनी जामनेर येथे 14 तारखेला भाजपात प्रवेश केला. तर मुज्जमिल शहा एकताबी शेख यांचे पती लतीफ शेख अपक्ष नगरसेविका सय्यद रुबीनाबी हरून यांचे दीर हकीम बागबा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांनी जरी भाजपात व शिंदे गटात प्रवेश केला असला तरी बोदवड नगरपरिषदेवर सत्तेमध्ये कोणतेच हेरफेर झालेले नाही, सत्ताधारी गटाचे फक्त संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आता गटनेते जफर अल्ताफ शेख आणि स्वीकृत नगरसेवक दीपक झांबड हे दोनच नगरसेवक उरले आहेत