Jalgaon Political News | अशोक चव्हाणांचा फॉलोवर म्हणून माझ्यावर शंका - आ. चौधरी

कॉंग्रेसच्या आमदारांची मते फुटल्याचा आरोप; यामध्ये आमदार चौधरी यांच्या नावाचीही चर्चा
रावेरचे आमदार शिरीष चौधरी
रावेरचे आमदार शिरीष चौधरी file photo

जळगाव : नुकतच विधान परिषदेमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे आमदारांचे मत फुटले यावरून बरेच खलबते सुरू आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेरचे एकमेव आमदार असलेले शिरीष चौधरी यांची ही नाव आले. त्यांनी याबाबत खुलासा करत सांगितले की "मी अशोक चव्हाण यांचा फॉलोवर आहे... म्हणून कदाचित सेक्युलेशन च्या बातम्या येत असतील मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आमच्यात मैत्री आहे मात्र राजकीय दृष्ट्या ते सांगतील आणि मी ऐकले असे नाही." असे आ.शिरीष चौधरी म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची आठ मते फुटली यावरून प्रदेशाध्यक्ष यांनी चांगलाच फायदा घेत लवकरात लवकर फुटलेल्यांवर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका घेतली. कारण या वेळेस काँग्रेस पक्षश्रेष्ठीने एक पॅटर्न तयार केलेले होते व त्या पॅटर्न मुळे कोण फुटले कोण नाही याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना आल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेस विचारांशी जोडलेली आमची नाळ 70 ते 80 वर्ष जुनी आहे 2009 मध्ये अपक्ष निवडून आलो. त्यावेळेसही कोणत्याही अटी शर्ती न टाकता काँग्रेस बरोबर पाठिंबा दिला. 2019 मध्ये आघाडीचे सरकार असताना कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही. युतीच्या सरकारमध्ये माझ्या मतदारसंघात जी कामे मंजूर होती त्या निधींनाही स्थगिती देण्यात आलेला आहे. मात्र त्यासाठी मी मी कोणाशी जोडून घेईल असेही नाही

युती सरकारच्या काळात काँग्रेस मधून अनेक जण गेले त्यावेळेस माझ्या नावाची ही चर्चा होती मात्र मी कधीही काँग्रेस सोडलेले नाही कारण मी काँग्रेसच्या विचारा लोकांची सेवा केलेली आहे मी कोणत्याही प्रकारची लबाडी केली नाही विधान परिषदेच्या निवडणुकीत माझे मत फुटले असे सेक्युलेशन केले जात आहे खात्रीशीर कोणी सांगू शकत नाही कारण ते गुप्त मतदान आहे यामध्ये दोनच गोष्टी एक अशोक चव्हाण यांचा मी फॉलोवर आहेत त्यामुळे कदाचित माझ्या नावावर शंका येत असेल परंतु ते काँग्रेस सोडून गेल्यापासून आमची फक्त मैत्री आहे राजकीय दृष्ट्या काहीच नाही ते सांगतील आणि मी ऐकले असे नाही. लबाडी ची भूमिका घेतलेली नाही आणि ती परवडणारे नाही वाईट एकाच गोष्टीचे वाटते की कोणाकडून अपेक्षा करायची ते सगळे बुरुज ढासळलेले आहेत असे ते म्हणाले नीती भ्रष्ट काम केलेले नाही. कोण फुटले कोण नाही त्यांना विनंती करतो की त्यांनी नावे जाहीर करावी व त्यांच्या पुढील कारवाई करावी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी करू नये असे आव्हान त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news