Jalgaon Crime News: सिल्लोडच्या 'बहाद्दरांचा' जळगावात राडा; कमरेला कट्टा अन् खिशात काडतुसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव शहरातील एअरपोर्ट रोडवर 'शूटर' स्टाईलने फिरणाऱ्या दोन तरुणांच्या एमआयडीसी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने मुसक्या आवळल्या.
Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsfile photo
Published on
Updated on

Jalgaon Crime News

जळगाव: शहरातीलएअरपोर्ट रोडवर 'शूटर' स्टाईलने फिरणाऱ्या दोन तरुणांच्या एमआयडीसी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे जळगावात अवैध शस्त्र विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. संशयित आरोपींनी हे शस्त्र तांबापुऱ्यातील एका सराईताकडून विकत घेतल्याची कबुली दिली असून पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

थरारक पाठलाग अन् अटक

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा-एअरपोर्ट रस्त्यावर काही तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची 'टीप' एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने एअरपोर्ट जवळील तारा बिझनेस पार्क परिसरात सापळा रचला. यावेळी एका पल्सर (RS 200) स्पोर्ट्स बाईकवरून दोन तरुण संशयास्पदरित्या येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

Jalgaon Crime News
Harish Sarda Arrest | अखेर खंडणीखोर हरीश सारडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

झडती घेताच पोलिसांनाही बसला धक्का

ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता, दुचाकी चालकाच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तुल) खोचलेला आढळला, तर खिशात ३ जिवंत काडतुसे मिळून आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक ठकुबा गुंजाळ (२८) आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे (२५, दोन्ही रा. दुर्गा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

तांबापुऱ्यातील 'कनेक्शन' उघड

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी पोपटासारखे बोलायला सुरुवात केली. हा गावठी कट्टा त्यांनी जळगावमधील तांबापुरा भागातील अजय बिरजू गारुंगे याच्याकडून खरेदी केल्याचे कबूल केले. सध्या अजय गारुंगे हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात पिस्तुल, काडतुसे, १ लाखाची पल्सर बाईक आणि मोबाईलचा समावेश आहे.

यांनी केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बबन आव्हाड, पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी, नितीन ठाकूर आणि चेतन पाटील यांच्या पथकाने केली. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jalgaon Crime News
Nashik Crime | ‘पिस्तुल्या’ धिरज कोळीला जिल्हापेठ पोलिसांचा इंगा! भरवस्तीत कट्टा-तलवारींचा खेळ; 'मोस्ट वॉन्टेड' आरोपीला बेड्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news