

जळगाव : लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग चे २८ ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ७. ३० वाजता क्रिकेट लीगचे थाटात उदघाटन केले जाईल. शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ येथे सामने भरविण्यात येणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या लीगच्या ब्रँड अँबेसेडर राहणार आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ अशे स्मृती चिन्ह दिली जाणार आहेत.
पहिल्यांदाच महिलांसाठी या प्रकारची बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली आहे. सहभागी बहुतांशी महिलांनी यापूर्वी कधीच क्रिकेट व अन्य खेळ खेळले नाहीत. मात्र आयोजकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि समाजातील भगिनींच्या भक्कम साथीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्ये आहे. स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार अमोल जावळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी आदी प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेसाठी गोदावरी फाऊंडेशन संचालित महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, एस व्ही पी एल सोलर चे संचालक हिमांशू इंगळे, डॉ पंकज पाटील, डॉ मनीष चौधरी, डॉ जितेंद्र ढाके, महेश चौधरी, दीपक पाटील, चेतन पाटील, दीप्ती ढाके, जयेश नारखेडे, डॉ वैभव पाटील, सोहम खडके, भूषण चौधरी, गौतम चौधरी, डॉ गौरव महाजन, निलेश चौधरी, हरीश कोल्हे, आशुतोष पाटील, तेजस रडे, योगेश खडके, जयेश भंगाळे, माधुरी अत्तरदे, सूचिता चौधरी, प्रीती महाजन, राधा कोल्हे, गायत्री राणे, पल्लवी चौधरी, पूजा महाजन, शर्वरी काळे, गायत्री महाजन, पूजा सरोदे, अमित भंगाळे आदींचे सहकार्य लाभले आहे.