जळगाव : 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

'माझी वसुंधरा अभियान', वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस
Jalgaon Vavadda School
माध्यमिक विद्यालय वावडदा या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम राबविताना विद्यार्थी व शिक्षक.(छाया: नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : येथील माध्यमिक विद्यालय वावडदा या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षलागवड अभियान हाती घेतले आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व 'एक पेड मां के नाम' यानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

वावडदा येथील शाळेच्या परिसरात करंज, आवळा, आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ, निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारची ५० झाडें मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन, वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. दाणे, शिक्षक ऐ. डी. पाकले, एम. डी. अहिरे, एम. आर. चौधरी, एस. बी. पाटील, ए. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने 'एक मुलं एक झाड' ही संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्याने राबविली पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड आदींनी परिश्रम घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news