

जळगाव : भुसावळ विभागातील पार्सल सेवा आता डिजिटलदृष्ट्या सक्षम झाली असून, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांत विभागाने एकूण ९४.७६ टक्के महसूल डिजिटल पद्धतीने जमा केला आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इकॉनॉमी’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये ठोस योगदान देत पार्सल व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित व जलद करण्यावर भर दिला आहे.
६९ टक्के महसूल पॉईंट ऑफ सेल (PoS) मशीनद्वारे
१८ टक्के महसूल डिमांड ड्राफ्ट/व्हाउचरद्वारे
८ टक्के महसूल QR कोडच्या माध्यमातून
पार्सल व्यवहार डिजिटल माध्यमांतून अधिकाधिक सुलभ व्हावेत यासाठी विभागाने विविध तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत. प्रवासी व व्यावसायिक ग्राहकांसाठी POS मशीन, QR कोड आदी सुविधांची माहिती पुरवली जात आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी प्रशिक्षण, तसेच कॅशलेस व्यवहारासाठी जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. भुसावळ विभाग भविष्यातही डिजिटल व्यवहारांचा वापर वाढवण्यास कटिबद्ध असून, नागरिकांना उत्तम, आधुनिक सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.