

जळगाव : पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्रींचे सोमवार (दि.24) रोजी सकाळी निधन झाले. दुपारी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
पाचोरा भडगाव येथील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील (91) यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले होते. सोमवार (दि.24) रोजी सकाळी 4.55 वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा चिंतामणी कॉलनी, भडगाव रोड पाचोरा दुपारी राहत्या घरुन निघणार आहे. दुपारी 3:00 वाजता अंत्यविधी अमरधाम (स्मशानभूमी), पाचोरा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात आमदार किशोरआप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.