Jalgaon | जिल्ह्यात वाढले एक लाख चोवीस हजार मतदार

Jalgaon, Maharashtra Assembly Election 2024 | सर्वांधिक संख्या महिला मतदारांची
Maharashtra Assembly Election 2024
जिल्ह्यामध्ये वाढले एक लाख चोवीस हजार मतदारFILE
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यामधील अकरा विधानसभा मतदासंघात पाच वर्षांत एक लाख 24 हजार 534 मतदारांची संख्या वाढली आहे. चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर ,जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर हे अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. या अकरा विधानसभा क्षेत्रात 2019 पेक्षा 2024 या कालावधीमध्ये एक लाख 24 हजार 534 मतदार वाढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्वांधिक संख्या ही महिला मतदारांची आहे. त्यानंतर पुरुष त्यानंतर तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांमध्ये 2019 मध्ये एकूण मतदार 35 लाख 31 हजार 114 मतदार होते. तर 2024 मध्ये 36 लाख 55 हजार 648 मतदारची नोंदणी झालेली आहे. यामध्ये महिलांनी बाजी मारली 2019 पेक्षा 2024 मध्ये 74947 महिला मतदारांची नोंदणी तर पुरुष मतदारांची 49576 अशी वाढ झालेली आहे.

अकरा विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघात 2019 पेक्षा 2024 मध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला मतदार ज्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

तृतीय पंथीय 11 दिव्यांगांची 817 तर जेंडर मध्ये 15.36 टक्क्याने वाढ झालेली आहे. मात्र 85 ते 120 वयोगटातील 2394 मतदारांची संख्या कमी झालेली आहे.

चोपडा( एसटी राखीव)

पुरुष 2391, महिला 5431, तृतीयपंथी एक - एकूण 7823

रावेर

पुरुष 3428, महिला 5227, तृतीयपंथी शून्य- एकूण 8655

भुसावळ (एस सी राखीव)

पुरुष 6243, महिला 9005, तृतीयपंथी तीन- एकूण 15251

जळगाव सिटी

पुरुष 12792, महिला 16571, तृतीयपंथी दोन- एकूण 34 हजार 365

जळगाव ग्रामीण

पुरुष 110, महिला 7789, तृतीयपंथी शून्य- एकूण 12,799

अमळनेर

पुरुष 1372, महिला 2936, तृतीयपंथी शून्य- एकूण 4308

एरंडोल

पुरुष 2248, महिला 3636, तृतीयपंथी शून्य- एकूण 4308

चाळीसगाव

पुरुष 5195, महिला 6909, तृतीयपंथी शून्य- एकूण 12104

पाचोरा

पुरुष 4810, महिला 6785, तृतीयपंथी 2 -एकूण 11597

जामनेर

पुरुष 3556, महिला 6256, तृतीयपंथी 1- एकूण 8265

मुक्ताईनगर

पुरुष 2531, महिला 4397, तृतीयपंथी 2- एकूण 6936

जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा मध्ये एकूण पुरुष 49576, महिला ७४९४७, तृतीयपंथी 11 असे एकूण 1,24,534 इतकी मतदारांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news