

जळगाव | जिल्ह्यातील पोलीस दलाला गुन्हे उघड करण्यामध्ये 2023 व 24 मध्ये यश मिळालेले आहे. इतर गुन्ह्यांमध्ये न उघडकीसचे प्रमाण हे जवळपास दोन्ही वर्षे सारखेच आहे. 2024 मध्ये गुन्ह्याच्या नोंद मध्ये घट झालेली आहे. गुन्हे उघडकीस येण्यासाठी राज्य शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी 8 फॉरेन्सिक लॅब असलेली वाहने लवकरच मिळणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली
डीपीडीसीच्या बैठकीत आमदारांनी पोलीस प्रशासनाच्या वर ताशेरे ओढले होते. या ताशेरेंना उत्तर देत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी संदीप गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी 2023 व 2024 मधील गुन्हे नोंद करण्यात आलेल्या आकडेवारी माध्यमांच्या समोर ठेवली त्यामध्ये 2023 पेक्षा 2024 मध्ये गुन्ह्याची आकडेवारी कमी आहे. व या दोन्ही वर्षांमध्ये खून व खुनाचा प्रयत्न हे शंभर टक्के उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले आहे.
2023 मध्ये खून 66 दाखल होते त्यापैकी दोन उघड झाले नव्हते 97टक्के तर 2024 मध्ये 65 कोणाचे गुन्हे दाखल होते 100 टक्के उघडकीस आलेले आहेत
कुणाचा प्रयत्न 118 गुन्हे दाखल होते तर 2024 मध्ये 115 दाखल होते हे 100 टक्के दोन्ही वर्षात उघड झालेले आहेत 2024 मध्ये तीन गुन्हे कमी दाखल आहे
जबरी चोरी 2023 मध्ये 81 टक्के निकाल काढली होती त्यामध्ये 28 प्रकरणे अजून उघडलेले नाही 2024 मध्ये 76 टक्के हे प्रमाण असून 25 गुन्हे अजून उघडकीस हे बाकी आहे मात्र 2024 मध्ये तीन गुन्हे कमी दाखल झालेले आहेत
चैन स्नॅचिंग यामध्ये 2023 मध्ये 65 टक्के गुन्हे उघडकीस आलेले आहेत 11 गुन्हे अजूनही उघड होणे बाकी आहेत 2024 मध्ये 39 टक्के गुन्हे उघडकीचे प्रमाण आहे व 17 गुन्हे अजून उघडकीस येणे बाकी आहे 2024 मध्ये तीन गुन्हे कमी दाखल आहेत.
घोरपडी 2023 मध्ये 34% उघडकीचे प्रमाण आहे तर अजून एक 264 गुन्हे उघड की येण्यास बाकी आहे 2024 मध्ये हे प्रमाण 34 टक्के असून 240 गुन्हे उघडकीचे बाकी आहेत मात्र 2024 मध्ये 2023 पेक्षा 33 गुन्हे कमी दाखल आहेत
चोरी यामध्ये 2023 मध्ये 36 टक्के उघड किती प्रमाण आहे मात्र न उघडलीस आलेले 1310 असून 2024 मध्ये हे प्रमाण 34 टक्के असून न उघडकीचे ११४५ गुन्हे बाकी आहेत तर 2024 मध्ये 312 गुन्हे कमी दाखल झालेले आहेत
वाहन चोरीमध्ये 27% 2023 मध्ये उघड किती प्रमाण आहेत तर 652 गुन्हे अजून उघडकीचे बाकी आहेत तर 2024 मध्ये गुन्हे उघडतीचे प्रमाण 26 टक्के असून 629 गुन्हे अजूनही बाकी आहेत मात्र 2023 पेक्षा 2024 मध्ये 39 गुन्हे कमी दाखल झालेले आहेत
तीन चाकी किंवा चार चाकी यामध्ये 2023 मध्ये 48% उघडकीचे प्रमाण असून 35 गुन्हे अजूनही उघडतीचे बाकी आहेत तर 2024 मध्ये 41 टक्के हे उघडकीचे प्रमाण असून 29 गुन्हे आगरी उघडकीचे बाकी आहेत मात्र 2023 पेक्षा 2024 मध्ये 18 गुन्हे कमी दाखल आहेत
दंगे 2023 मध्ये 100% दंगे उघडकीस आलेल्या यामध्ये फक्त एक प्रकरण आधुनिक वरती झालेले नाही तेच 2024 मध्ये 99% प्रमाण असून चार गुन्हे अजूनही उघडकीस आलेले नाही मात्र 2023 पेक्षा 2024 मध्ये 62 गुन्हे कमी दाखल झालेले आहेत
आर्म मध्ये 40 गुन्हे दाखल असून 100 टक्के गुन्हे उघडकीस आलेले आहेत तर 2024 मध्ये 68 गुन्हे दाखल असून तेही शंभर टक्के गुन्हे दाखल असून उघडकीस आलेली आहे.
पोलीस प्रशासनाच्या कारवाया एमडीपीएस हद्दपार या कारवाईमुळे यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले आहेत व त्यांची संख्या ही घटलेली आहेत मात्र दुसरीकडे घरफोडी चोऱ्या व वाहन चोरी यांच्यात जरी 2024 मध्ये घट दिसत असली .वाहन चोरी यामध्ये एक पॅटर्न दिसून येत आहे व ठराविक जागेवरूनच गाड्या चोरी जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या तपासामध्ये समोर आलेले आहेत
जळगाव पोलीस प्रशासन लवकरच एक ॲप सुरुवात करणार आहेत या ॲप मध्ये ज्या संशयित गुन्हेगाराकडं प्रतिबंधक कारवाई किंवा बॉण्ड घेण्यात येईल तो बॉण्ड त्याच्या ऐपत पाहून त्याच्याकडून घेण्यात येणार आहे तसेच त्या बॉण्डची संपूर्ण माहिती त्या ॲप मधून देण्यात येणार असून संबंधित पोलीस ठाण्याच्या अंमलदार व हवालदार यांना तिची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याने काही ॲपराध जण हलचाली केल्यास त्याच्या बद्दल ची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या गुन्हेगारा कडून त्याला कितीचा बॉण्ड घेण्यात आलेला आहे त्याच्यावर कोणती कारवाई झालेली आहे याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला व तेथील अंमलदारला या ॲपच्या माध्यमातून लागलीच मिळेल असे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले