

जळगांव : जळगाव शहरात वाहनांना व रहदारीला अडथळे निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने काही ठिकाणी नो पार्किंग झोनचे बोर्ड लावलेले आहेत. मात्र, हे नियम फक्त बोर्डावर दिसण्यापुरतेच राहिलेले आहेत. अजिंठा चौफुली या ठिकाणी असलेल्या नो पार्किंग झोनच्या ठिकाणी लोकांनी वाहने लावलेली दिसतात. भुसावळला येणारी वाहने, रिक्षा व इतर ठेले या ठिकाणी उभी असतात. त्यामुळे कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव शहरात येण्या व जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेला म्हणजे अजिंठा चौफुली या चौफुली वरून औरंगाबाद भुसावळ मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग निघतात. ही चौफुली मोठी असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची वरदळ असते. तर रस्त्याच्या बाजूला वाहने उभे राहू नये यासाठी महानगरपालिकेने काही ठिकाणी नो पार्किंग झोनचे बोर्ड लावलेले आहे. तीनशे मीटरच्या आसपास कोणीही अतिक्रमण किंवा गाड्या वाहने लावू नये अशा स्पष्ट सूचना आहे. मात्र असे असतानाही त्या ठिकाणी लोटगाडी प्रवासी ऑटो रिक्षा सिक्स सीटर यासारखी वाहने त्या ठिकाणी लागलेली असतात. जेव्हा की महानगरपालिकेने फलक लावून नो पार्किंग झोन जाहीर केलेला आहे व त्या ठिकाणी 300 मीटरच्या आत कोणतेही वाहने किंवा काही लावू नये अशा सूचना त्यावर लिहिलेल्या आहे मात्र या फक्त सूचनाच राहिलेल्या आहे. वाहतूक शाखेचे पोलीस तर दुसरीकडे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग यापैकी कोणाकडूनही यावर कारवाई होताना दिसत नाही.
सदरचे नो पार्किंग झोन हे महानगरपालिकेने बोर्ड लावून जाहीर केलेले आहे. त्यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करून वाहनांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक