जळगाव : राज्य सरकारने गणेशोत्सव, जेष्ठागौरी पूजन सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानांमधून आनंदाचा शिधा मिळणार अशी गोड घोषणा केली. मात्र गौरी गणपती आणि श्राद्धाचा कार्यक्रम आणि सण उत्सव पार पडल्यानंतरही अद्याप पर्यंत शिधा मिळाला नसल्याने लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शिधाबाबत संबंधित ठेकेदाराला तीन ते चार वेळा नोटीस बजावूनही संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही. राज्याचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा क्षेत्रातही आनंदाचे शिधाचे अद्याप वाटप झालेले नाही. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असो की आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मतदारसंघात देखील आनंदाचा शिधा वाटप झालेला नाही
रवा 97 टक्के, साखर 4.21 टक्के, चणाडाळ 89 टक्के, खाद्यतेल 39.71टक्के पिशव्या 75 टक्के असा पुरवठा जिल्ह्यात मध्ये पुरवठा विभागाच्या गोदामामध्ये आनंदाच्या शिधा वाटप झालेला आहे