Jalgaon News | पोलिसांच्या चौक्या उरल्या फक्त नावाला

पोलीस चाैकींना असते कायम टाळे; सर्वसामान्य जनतेची निरोशा
जळगाव
पोलीस चौकीला टाळे लागलेले असल्याने सर्वसामान्य जनतेची घाेर निरोशा होत आहे. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यामधील काही तालुके सराईत गुन्हेगारांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या ठिकाणी पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गुन्हेगारी फोफावत असल्याचे निर्दशनास येते. या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र सध्याला पोलीस रेकॉर्डनुसार जरी गुन्हेगारी किंवा गुन्हेगारींची कारवाई शून्य झालेली असली तरी जामिनावर सुटून येताच चाकूने वार होण्याच्या घटना घडून येत असल्याने पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काही परिसरात पोलीस चौक्यांना वारंवार टाळे लागले असल्यामुळे जनतेकडून नाराजी व्यक्त होत आहे.

जळगाव
(छाया : नरेंद्र पाटील)

पोलिसांपेक्षा गुन्हेगारांचे गुप्तहेर वाढलेले दिसत आहे. 2020 मध्ये झालेल्या खून खटल्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला चार वर्षानंतर जामीन मिळाल्यावर जेलमधून बाहेर येत असते त्याच्यावर दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला.

जळगाव
(छाया : नरेंद्र पाटील)

शहरामध्ये व शहरातील महत्त्वाचे भागांमध्ये काही अनिष्ट प्रकार घडू नये, म्हणून पोलीस स्टेशन अंतर्गत काही चौक्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. मात्र या चौकांवर अधिकारी कर्मचारी आपापल्या ड्युटी नुसार आपल्या कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा असताना जनतेची निराशा होत आहे. एमआयडीसी मधील नुकतीच उद्घाटन झालेली चौकी असो किंवा शहरातील डी मार्ट जवळील या सर्व चौंक्यावर टाळे लागलेले दिसून येत आहे.

जळगाव
कोणीही फिरकत नसल्याने पोलीस चौकीला भग्नवस्थेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.(छाया : नरेंद्र पाटील)

या चौकींच्या माध्यमातून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्यात येते, मात्र शहरातील बहुतांशी चौक्या या ताळे लावून बंद दिसून येत आहेत. बंद पडलेल्या चौक्यांमुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात परिसरात फोफावत आहेत. अज्ञात व्यक्तींकडून हल्ले होऊन पोलीस यंत्रणेलाच एका प्रकारे गुन्हेगार आव्हान देताना दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news