

जळगाव : राज्य सरकार स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.) व प्रायॉरिटी हाऊस होल्ड (PHH) कार्ड अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र यामध्ये एप्रिल 2024 पासून आजपर्यंत साखर पुरवठाच झाला नसल्याने रेशनधारकांचा गाेडवाच गायब झाला आहे
अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.) व प्रायॉरिटी हाऊस होल्ड (PHH) कार्ड अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून लाभधारकांना राज्य सरकारकडून साखर उपलब्ध करून देत असते. शासनाकडून दर तीन महिन्याचा पुरवठा हा जिल्हानिहाय उपलब्ध करून देण्यात येत असतो. मात्र एप्रिल 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत अंत्योदय अन्न योजनासाठी साखरेचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एक लाख 34 हजार 475 लाभार्थ्यांना साखरेचा गोडव्यापासून वंचित रहावे लागत आहे. मागील काही काळात निवडणूकीच्या धामधुमीतही अंत्योदय अन्न योजनामधील साखरेचा पुरवठा झालेला नाही.
अमळनेर 9006
भडगाव 7035
भुसावळ 5,141
बोदवड 3852
चाळीसगाव १७१९३
चोपडा 10 273
धरणगाव 7046
एरंडोल 5859
जळगाव 13353
जामनेर 10163
मुक्ताईनगर 8182
पाचोरा 9560
पारोळा 7342
रावेर 10739
यावल 10731
एकूण 135457 लाभार्थी आहे .