Jalgaon news | शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांने जीवन संपवले ; कारण अस्पष्ट 

Life Ended News
Life Ended News
Published on
Updated on

जळगाव : शहरातील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या १८ वर्षीय रोहित समाधान पवार या विद्यार्थ्याने मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रोहितच्या या टोकाच्या पावलामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रोहित पवार हा मूळचा धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी होता आणि जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आज मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही’ असे रोहितने वडिलांना सांगितले होते. वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्राम स्टेटसने वाढवलं गूढ 

जीवन संपवण्यापूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सूचक स्टेटस ठेवला होता. त्यात त्याने म्हटले होते की, “इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये, कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.” या स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर रोहितच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ताणतणावाचे निर्मूलन करण्यासाठी शासकीय वसतिगृहात समाज कल्याण विभागाकडून समुपदेशकांची (सायकॉलॉजिस्ट) नियुक्ती तात्काळ सहायक आयुक्तांनी केली पाहिजे असे मत यावेळी इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news