जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे हे नुकतेच घरी आल्यानंतर आज ना. प्रल्हाद पटेल यांनी खडसे यांच्या घरी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर खामगाव व अकोला येथे कार्यक्रमासाठी गेले.
खाद्य संस्करण उद्योग आणि राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी आज मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊसवर येऊन माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंदा खडसे यांनी ओवळणी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी शाल देऊन त्यांचे स्वागत केले तर खडसे यांनी पुष्पगुच्छ व गोमातेचे चिन्ह भेट म्हणून दिले.
यावेळी प्रल्हाद पटेल व खडसे यांच्यात बऱ्याच राजकीय विषयांवर खलबते झाले. याबाबत एकनाथराव खडसे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी नुकताच स्वाइन फ्लू व निमोनिया आजारातून बरा झालोय. त्यामुळे माझे जुने सहकारी व मित्र प्रल्हाद पटेल यांनी भेट घेतली. भाजपाच्या प्रवेशाविषयी असे काहीच नाही. ही एक फक्त सदिच्छा भेट होती.