

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यतः अजित पवार पक्षाच्या गटाला कधीच गळती लागणार नाही. शरद पवार गटाचे नेते अरुण भाई गुजराती हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्री कोकाटे म्हणाले की, जळगाव व भुसावळ या ठिकाणी आजी व माजी आमदार खासदार यांच्या मतदारसंघनिहाय मुलाखती घेतल्या. ज्यांची तेवढी ताकद आहे, त्याप्रमाणे त्यांच्याशी युती होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यावर कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत. सध्या राष्ट्रवादीत अनेकांचे प्रवेश सुरू असून शरद पवारांचे खंदे समर्थक अरुणभाई गुजराती राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यांनी सांगितले.