Jalgaon News : माजी महापौर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी जामीन मंजूर

Jalgaon News : माजी महापौर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी जामीन मंजूर
Published on
Updated on

जळगाव : बनावट कॉल सेंटर प्रकरणी कारागृहात असलेले माजी महापौर ललित विजयराव कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ममुराबाद रोडवरील 'एल. के. फार्म'वर पोलिसांनी छापा टाकला होता. या ठिकाणी बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी फार्मचे मालक ललित कोल्हे यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयानेही फेटाळून लावला होता.

दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या मध्यंतरी झालेल्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी कारागृहात असतानाच निवडणूक लढवली आणि विजयही संपादन केला. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून, कोल्हे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news