जळगाव | अवैधरित्या वाहनात गॅस रिफिलिंग करीत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 11 जण जखमी झाले होते. यामध्ये काही गंभीर रुग्ण यांच्यावर मुंबई पुणे येथे उपचार सुरू होते. पुणे येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे गॅस सिलेंडर स्फोट मध्ये अद्याप पर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र प्रशासनाने अशी कोणतीही कडक कारवाई करताना दिसून आलेले नाही. पोलिसांच्या छत्रछायेत सुरू असलेले अवैध रिफिलिंग सेंटर आजही पडद्याआड सुरू आहे.
वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना गॅस सिलेंडरचा स्फोटात ११ जण भाजल्याची घटना ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी घडली होती.
पुणे येथील गणेश पेठ पुणे या ठिकाणी राहणारे संजय गणेश तेरवडीया (दालवाले) हे पत्नी व मुलगीसह जळगावात राहत असलेल्या भरत दालवाले यांच्याकडे आले होते. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर दर्शनासाठी निघाले असताना. शहरातील ईच्छा देवी पोलीस चौकी शेजारी गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबले. वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.
बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना संजय तेरवडीया यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गरुवारी त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.