Jalgaon News | चक्कर येऊन पडल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Student dies due to dizziness : चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
yaval, jalgaon
यावल तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेतील नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला.pudhari news network
Published on
Updated on

जळगाव : यावल तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेतील नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी यावल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकार ही संपर्क साधला असता शवाविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट ते कारण समजू शकेल असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

yaval, jalgaon
Nashik News | विद्यार्थीनीचा वर्गातच मृत्यू, नाशिकमधील घटनेने खळबळ

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथे आदिवासी आश्रम शाळा आहे\ या आश्रम शाळेत यावल तालुक्यातीलच हिंगोणा येथील नऊ वर्षांचा फुलसिंग पहाडसिंग बारेला हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवार (दि.5) रोजी शाळेत सकाळी त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. शिक्षकांनी तातडीने त्याला यावल येथील ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी तपासणीनंरत विद्यार्थ्याला मृत घोषित केले. नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच खळबळ उडाली आहे.

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजणार

राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालय गाठून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फुलसिंग बारेला याची रविवार (दि.4) रोजी तब्येत खराब होती. त्याच्यावर औषध उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोमवार (दि.5) रोजी सकाळी तब्येत आणखी खराब झाल्यानंतर यावल येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू नेमके कशामुळे झाला याचे कारण शवविच्छेदनानंतरच समजणार आहे. कोणावर कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news