Eknath Khadse: 'नाथाभाऊ काय आहे ते दाखवतो...', पोलीस अधिकाऱ्यांशी खडसेंची आक्षेपार्ह शब्दात हुज्जत; नेमकं वाद काय?

Eknath Khadse: त्यांनी उपस्थित नागरिकांसमोरच राज्य शासनाच्या संबंधित मंत्र्यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले.
Eknath Khadse
Eknath Khadse Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : रावेर तालुक्यातील टासखेडा येथील वाळू प्रकरणावरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. विधान परिषद आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी (दि. ११) सावदा पोलीस ठाण्याच्या गेटवर सहायक पोलीस निरीक्षकांशी वाद घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडसे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२:३० च्या सुमारास एकनाथ खडसे आपल्या वाहनाने सावदा पोलीस ठाण्यात पोहोचले. टासखेडा येथील गौण खनिज अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना विचारला. अधिकाऱ्यांनी यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याचे सांगितले, मात्र कागदपत्रांच्या मागणीवरून वादाची ठिणगी पडली.

अपमानास्पद वागणूक आणि मंत्र्यांचा उल्लेख

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर एकनाथ खडसे यांनी पोलीस अधिकाऱ्याला अत्यंत खालच्या भाषेत विचारणा करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘कायद्यानुसार चालू तपासाची कागदपत्रे देता येणार नाहीत,’ असे सांगताच खडसे यांचा पारा चढला. त्यांनी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याचा अपमान करत आगामी अधिवेशनात बघून घेण्याची धमकी दिली.

यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांसमोरच राज्य शासनाच्या संबंधित मंत्र्यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले. तसेच, ‘तुझ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो आणि नाथाभाऊ काय आहे ते दाखवतो,’ असा इशाराही त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला दिला.

'भारतीय न्याय संहिते'नुसार गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याच्या आवारात भरदिवसा हा प्रकार घडला. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 296, 221, 351(2), 352 ,112,117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला. या प्रकरणाचा तपास आता उपअधीक्षक सुभाष मुरलीधर ढवळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news