

जळगाव : भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटलांनाही बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नऊ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी या खरगोन मुक्ताईनगर इंदौर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी संपादीत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही जमीन अधिग्रहित झालेली आहे. मात्र जमीन आमदारांची आणि लाभ देताना दुसऱ्याचे नाव असा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उघड झाला आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री पासून तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार दाखल केली आहे.
इंदौर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय होत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटील यांनाही बसला आहे. त्यांनी आता या प्रकरणी संतप्त होत टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदौर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा घोटाळा होत असल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांनी आरोप केला आहे. भूसंपादनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावावर असलेली जमीन बाळकृष्ण चौधरी यांच्या नावाने दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प दर दिला जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास गुरुवार (दि.13) रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इंदौर हैदराबाद महामार्ग चौपदरीकरण कामासाठी केल्या जात असलेल्या भूसंपादनात सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदौर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा घोटाळा होत असून आपल्या नावाने असलेली जमीन भूसंपादनात दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही आमदार चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जमिनी हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेतू पुरस्सर केल्या जात असल्याचा संशय ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवार (दि.11) रोजी इंदौर हैदराबाद महामार्ग चौपदरीकरण कामासाठी हा राष्ट्रीय महामार्ग 75 एल या रस्त्यात जमीन अधिग्रहीत झालेल्या नऊ गावांमधील 128 शेतकरी काम बंद आंदोलन करणार आहेत. कारण त्यांना महाराष्ट्र रेडी रेकनर रेट नुसार दर देण्यात आलेला नाही. तत्कालीन प्रांत अधिकारी यांनी चुकीचे दर लावून शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही सुनावणी न घेता थेट निर्णय देत जुने दर कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अन्याया विरोधात मंगळवार (दि.11) रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आघाडी सरकारने बेटिंग मेथड नुसार शेत लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे कपात होणार आहे यावरही शेतकऱ्यांनी हा कायदा नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर जमिन अधिग्रहीत यादीमध्ये एकनाथराव खडसे व त्यांच्या परिवारातील केंद्रीय मंत्र्यांसह सर्वांची नावे आहेत, यांच्या जमिनी यामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत.