

Akhaji local celebration
जळगाव : आखाजी या सणानिमित्त प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी आंब्याचा रस होत असतो. याचा स्वाद प्रत्येक घरी खानदेशात होत असल्याने आज सुट्टी जाहीर नसतानाही शासकीय सर्व कार्यालयात सुट्टीचे वातावरण दिसत होते. जिल्हाधिकारी ते शिपाई आपापल्या कामात व्यस्त होते. मात्र कार्यालयात ना आंदोलन, निवेदन ना कोणाचे काम घेऊन येणारे व्यक्ती दिसत नव्हते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित होते. शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमावर त्यांचे कामकाज व देखरेख सुरू होती. शिपाई वर्ग आपापले काम करीत होते. प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपापल्या टेबलवर आपापले कामे पार पाडताना दिसून येत होते.
मात्र सकाळपासून दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ना आंदोलन, मोर्चेकरी, निवेदन देणारे, काम होत नाही म्हणून तक्रार देणारे कोणीही व्यक्ती कोणत्याच विभागात येताना किंवा जाताना दिसत नव्हता. ज्या पार्किंग मध्ये चार चाकी गाड्या लावण्यासाठी गर्दी झालेला असते तिथेही आज ओसाड दिसून येत होते. अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर मात्र नागरिक नसल्याने अघोषित सुट्टी असे वातावरण जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले होते.