.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागात एप्रिल महिन्यात पाळीव व भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे ८१४ जणांनी उपचार घेतले आहेत. यामध्ये ७६० रुग्ण श्वानदंशामुळे तर ३४ जण मांजर चावल्यामुळे दाखल झाले.
श्वानदंश रुग्णांमध्ये ४८६ पुरुष, १५५ महिला आणि १२५ लहान मुलांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील दाखल झाले होते. याशिवाय, उंदीर चावल्याने ६ पुरुष, माकडाने एका व्यक्तीला, डुकराने ३ जणांना, तर ३ जणांना माणसानेच चावा घेतल्याचे नोंदवण्यात आले आहे. तसेच एका महिलेला बोकडाने चावा घेतल्याची नोंद आहे.
डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, भटक्या व पाळीव प्राण्यांपासून दूर राहा, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्या. प्राणी चावल्यास जखम झाकू नये, स्वच्छ पाण्याने धुवावी आणि तत्काळ रुग्णालयात यावे. सकाळी ओपीडी क्रमांक १०९, तर दुपारी आपत्कालीन विभाग कक्ष क्रमांक १ येथे उपचारासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.