Jalgaon News | राष्ट्रीय लोक अदालती मध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली

Jalgaon : जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालती मध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली
National Lok Adalat
लोक अदालतfile photo
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि.२७) रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये न्यायालयातील प्रलंबित व वाद पूर्व अशी एकूण ७ हजार ३३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

राष्ट्रीय लोक अदालती शनिवारी (दि.२७) रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ५७६९ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १५६८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामाध्यमातून एकूण एकूण 32 कोटी 27 लाख 96 हजार 759 रुपये वसूल करण्यात आले आहे. तर सोमवार (दि.२२) ते शुक्रवार (दि.२६) रोजी पर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ५७२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख एम.क्यू.एस.एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी न्या. एस एन राजुरकर, न्या. एस पी सय्यद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.पी. सय्यद, जिल्हा वकील संघाचे एडवोकेट रमाकांत पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी. काबरा, न्या. एस आर.एल. भांगडिया, न्या. एस एन मोरवाले, न्या. एनजी देशपांडे, न्या.एस.एस. परदेशी, न्या. जे. एस केळकर, न्यायमूर्ती एस.व्ही. मोरे, न्या. डी.जे. सरनायक यांच्यासह अडवोकेट शितल राठी, पल्लवी जोशी, दीपक वाघ, रामकृष्ण कापुरे, शिरीन शेख यांनी सहकार्य केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक सुभाष एन. पाटील, कनिष्ठ लिपीक आर. के. पाटील, प्रमोद बी. ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपगारे, जयश्री पाटील, राहुल साळुंखे, राहुल पी. माकोडे, पवन पाटील, रणवीर राणा, प्रकाश काजळे, जावेद पटेल, सचिन पवार तसेच समांतर विधी सहायक निलेश महिंद्रे आदिंनी परीश्रम घेत लोक अदालत यशस्वी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news