

जळगाव : तालुक्यातील कानसवाडा गावात किरकोळ वादातून ३६ वर्षीय माजी उपसरपंच यांचा खून झाला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तर इतर एकाचा पोलीस शोध घेत आहेत
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कानसवाडा उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. या खुनाच्या प्रकरणांमध्ये भरत पाटील याच्यासह त्याच्या मुलांचा यामध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्यानंतर भरत पाटील पोलिसांच्या हाती लागला असून त्याची दोन्ही मुले पाटील व देवा पाटील अजूनही फरार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून संध्याकाळपर्यंत दोघा संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.