

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अंतिम आठ दिवसांमध्ये (दिनांक 10 ते 17 या कालावधीत मोठी वाढ दिसून आली आहे. अंतिम दिवशी सोमवार (दि.17) रोजी एकूण 128 नगराध्यक्षपदासाठी आणि 1673 सदस्यपदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. ज्यामुळे नामनिर्देशन दाखल झालेल्या उमेदवारांची एकूण संख्या 3,542 वर पोहोचली आहे. तर भुसावळ मध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सोमवार (दि.17) रात्री उशिरापर्यंत प्रांत कार्यालयात गर्दी होती
जिल्ह्यामधील 18 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवार (दि.17) रोजी अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन दाखल करण्यात आलेले आहेत महत्त्वाचे म्हणजे भुसावळ तालुक्यात 16 रोजी रात्रीपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते तसेच 17 रोजी सुद्धा रात्री उशिरापर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
एकूण 1673 128 3542 229
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सोमवार (दि.17) रोजी नगराध्यक्ष पदासाठी 128 अर्ज आणि सदस्यपदासाठी 1,673 अर्ज दाखल झाले, जी या संपूर्ण आठ दिवसांतील सर्वाधिक संख्या आहे.
सर्वाधिक अर्ज दाखल झालेले शहर असे...
सदस्यपद: अमळनेर नगरपरिषदेत सदस्यपदासाठी सर्वाधिक 377 अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्षपद: अमळनेर (30 अर्ज) आणि शेंदुर्णी (22 अर्ज) या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चुरस दिसून येत आहे.
पहिल्या आठवड्यात नामनिर्देशन अर्जासाठी पहिल्या दिवशी सोमवार (दि.10) रोजी नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, तर सदस्यपदासाठी फक्त 1 अर्ज दाखल झाला होता. रविवार (दि.16) रोजी नगराध्यक्षपदासाठी एकूण 59 अर्ज आणि सदस्यपदासाठी 1,095 अर्ज दाखल झाले होते. मात्र अंतिम दिवशी गर्दी झाल्याने एकूण आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे.
भुसावळ नगरपरिषदेसाठी सोमवार (दि.17) रोजी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत कामकाज सुरू होते, त्यामुळे भुसावळची अंतिम आकडेवारी अद्याप मिळालेली नाही. निवडणूक आयोगाकडून प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.