

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी आज सोमवार (दि.2) रोजी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सकाळच्या तुलनेत दुपारपर्यंत मतदानाचा वेग वाढल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने सांगितले. सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या दरम्यान जिल्ह्यात एकूण 29.49 टक्के मतदानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील मतदानाचा आढावा (दुपारी 1.30 पर्यंत)
एकूण मतदार: 8,81,510
एकूण मतदान: 2,59,998
पुरुष: 1,33,053 (29.79 टक्के)
महिला: 1,26,924 (29.18 टक्के)
इतर: 21 (25.30 टक्के)
एकूण टक्केवारी: 29.49 टक्के
सर्वाधिक आणि सर्वात कमी मतदान झालेले तालुके
सर्वाधिक मतदान: यावल – 40.79 टक्के
सर्वात कमी मतदान: भडगाव – 17.85 टक्के
तालुकानुसार मतदानाची टक्केवारी (7.30 ते 1.30)
यावल: 40.79 टक्के
फैजपूर: 38.96 टक्के
एरंडोल: 38.78 टक्के
भुसावळ: 27.99 टक्के
जामनेर: 27.97 टक्के
पाचोरा: 24.13 टक्के
भडगाव: 17.85 टक्के
जिल्ह्यातील मतदान सुरळीत सुरू असून दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.