

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवार (दि.20) रोजी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत, म्हणजेच सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४.२६ टक्के मतदान झाले असून, मतदारांमध्ये संमिश्र उत्साह पाहायला मिळत आहे.
मतदानाची सविस्तर आकडेवारी (सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत):
शनिवार (दि.20) रोजी आज सकाळी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी अशी...
नगरपरीषद एकूण झालेले मतदान (टक्केवारीमध्ये)
वरणगाव ५.९७ टक्के
पाचोरा ३.०५ टक्के
भुसावळ ३.४५ टक्के
अमळनेर ४.३९ टक्के
सावदा ३.५८ टक्के
यावल ७.११ टक्के
एकूण ३३,६६२.
झालेले मतदान १,४३५
टक्केवारी ४.२६ झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत एकूण १,४३५ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये ९४१ पुरुष आणि ४९४ महिला मतदारांचा समावेश आहे. थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.