जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे कोथळी येथील मुक्ताई मंदिरासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे व तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील यांचे वैर यामुळेही राज्यभर मुक्ताईनगर चर्चेत असते. त्यात खडसे परिवारातील मुलीची छेडखानी झाल्यामुळे पुन्हा एकदा मुक्ताईनगर चर्चेत आहे. या ठिकाणी राज्यात महायुतीचे पक्षातील भाजपा, शिवसेना व त्यामध्ये शरद पवार गट असे समोरासमोर आलेले आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता जरी असली तरी मुक्ताईनगरात दुरावा असून भीतीचे वातावरण आहे.
संपूर्ण राज्यात नव्हे तर देशामध्ये मुक्ताईनगर हे मुक्ताई मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मुक्ताई मंदिर प्रसिद्धी बरोबरच मुक्ताईनगर मधील वैर ही युतीच्या काळापासून ते आजपर्यंत प्रसिद्ध आहे. आमदार एकनाथ खडसे हे त्यावेळेस भाजपात होते. ते आता सध्याला शरद पवार गटात आहेत. तर त्यांच्या सुनबाई ह्या भाजपच्या खासदार व केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचे ज्यांच्या सोबत वैर आहे ते चंद्रकांत पाटील तत्कालीन जिल्हाप्रमुख व सध्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.हे वैर तेंव्हापासून सुरू असून आजही सुरू आहे.
यात्रेत झालेल्या छेडखानी प्रकरणांमध्ये आरोपी हे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पुतणे व नगरसेवक असल्यामुळे वाद जास्त चिघळला. खडसे यांनी यावर सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर आरोप केला तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, ते नगरसेवक भाजपातून शिवसेनेत आलेले आहेत आणि अशांना कडक कारवाई झालीच पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्येही निवडणूक व प्रचार सुरू झाल्यावर विद्यमान आमदार लवकर गेले नव्हते. यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांना स्टेजवर आणले. मग त्यांनी युतीचे कामकाज केले होते. यामुळे राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट जरी असला तरी मुक्ताईनगर मध्ये भाजपा शिंदे शिवसेना यांच्यामध्ये दुरावा व भीती आहे.

