जळगाव : चोपडा तालुक्यातील कर्जाणा येथील संशयित चोरीची मोटरसायकल वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. दोन दिवसानंतर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून तब्बल सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मोटरसायकलीचे प्रमाण वाढलेले असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मोटरसायकल चोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संदिप पाटील व प्रविण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना चोपडा तालुक्यातील कर्जाणा येथील संशयित आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला हा चोरीची मोटरसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याचा दोन दिवस शोध घेतला असता त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला हा त्याचे घरी कर्जाणा येथे आला असून तो रविवार (दि.8) दुपारी गावातून पळून जाण्याचा मार्गावर असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बबन आव्हाड यांनी पोलीस हवालदार संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या मोटर सायकलची विचारपूस केली असता यूनीफॉर्न मोटार सायकल ही पाचोरा येवून चोरी केल्याचे सांगीतले.
पाचोरा (२) पारोळा (१) मोहाडी जिल्हा धुळे (१) इतर (२) मोटार आरोपी कडून जप्त केलेल्या आहेत. असे एकूण ६ मोटार सायकल जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीला पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात देण्यात आले आहे.