जळगाव : भुसावळमध्ये राष्ट्रवादीच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचे राजीनामे

जळगाव : भुसावळमध्ये राष्ट्रवादीच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचे राजीनामे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर लोकसभेसाठी माजी आमदार संतोष चौधरी हे सुद्धा रिंगणात असताना उद्योजक श्रीराम पाटील यांना अचानक उमेदवारी देण्यात आली. यामुळे भुसावळ विभागातील चौधरींच्या तब्बल 220 कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुर्गेश ठाकूर व माजी गटनेते उल्हास पगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

रावेर लोकसभा हे महाआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आलेला आहे. या लोकसभेत गटासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी सुद्धा उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. त्याबाबतचा शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शब्द दिल्याचे म्हणून ते कामाला लागले होते मात्र अचानक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे माजी आमदार संतोष चौधरी यांचे समर्थकांनी  राजीनामे सत्र सुरू केले आहे भुसावळ विभागातील समर्थक प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी गटनेता उल्हास पगारे युवराज पाटील आदींसह रावेर यावल मुक्ताईनगर बोदवड वरणगाव या भागातील 220 पदाधिकाऱ्यांनी सामायिक राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. माजी आमदार संतोष चौधरी हे पंधरा रोजी संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीबाबत पुढील भूमिका ठरणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news