'लखपती दिदी' संमेलन
'लखपती दिदी' संमेलनात पंतप्रधानांचे आगमन(छाया :नरेंद्र पाटील)

जळगाव माेदी दौरा ! श्री गणेशाच्या आरतीने 'लखपती दिदी' कार्यक्रमास सुरुवात

जळगाव माेदी दौरा ! श्री गणेशाच्या आरतीने 'लखपती दिदी' कार्यक्रमास सुरुवात
Published on

जळगाव : 'लखपती दिदी' कार्यक्रमाच्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी (दि. 25) रोजी ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होत असून जळगाव विमानतळ परिसरातील 100 एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष 'लखपती दिदी' संमेलनाकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या संमेलनात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदींकडून जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन घोषणा केली जाणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव च्या महिलांना लखपती होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

पावसाचे वातावरणातही कार्यक्रमास शानदार सुरुवात करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री गणेशा, मन उधान वाऱ्याचे आणि छबीदार छबी तोऱ्यात उभी, हे वागणं बरं नव्हे अशी गाणी झाली. 'लखपती दिदी' कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेले डिस्प्ले ठेवण्यात आले आहेत. दिदींचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न कार्यक्रमातून केला जात आहे. 'लखपती दिदी' कार्यक्रमांमध्ये आलेल्या महिलांच्या मनोरंजन साठी गाण्याच्या कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news