Jalgaon Bike Theft | भुसावळ, एरंडोल येथून दोन चोरटे जेरबंद; 6 दुचाकी जप्त

जळगाव शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे
Jalgaon Bike Theft Racket Busted
Jalgaon Bike Theft Racket Busted Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Bike Theft Racket Busted

जळगाव : जळगाव शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एमआयडीसी आणि शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांनी स्वतंत्र कारवाया करत सहा चोरीच्या दुचाकी जप्त करून दोन संशयित चोरट्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे भुसावळ आणि एरंडोल येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

भुसावळमधून संशयिताला अटक; तीन दुचाकी जप्त

आयोध्या नगर येथील मनोज गरुड यांची सीबी शाईन दुचाकी (एमएच १९ डीडी ८३२३) १४ ऑगस्ट रोजी व्ही. सेक्टर लिड्स इंडस्ट्रीज कंपनीच्या बाहेरून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jalgaon Bike Theft Racket Busted
Jalgaon Crime News: अत्रावलमधील मारहाण प्रकरणात फरार पोलीस शिपाई अखेर खाकीच्या तावडीत

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद शहा अस्लम शहा याचा माग काढत त्याला भुसावळ येथून ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यामध्ये सीबी शाईन — किंमत सुमारे २५ हजार रुपये, हिरो स्प्लेंडर (विना क्रमांक) किंमत सुमारे २० हजार रुपये, बजाज सिटी १०० (विना क्रमांक) किंमत सुमारे ५० हजार रुपये अशा एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

एरंडोल बसस्थानकावर सापळा; दुसरा चोरटा जेरबंद

बालाजी पेठ येथील रहिवासी निलेश बोरसे यांची बजाज पल्सर दुचाकी १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी १८ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या सूचनेनुसार पीएसआय संतोष खेडकर आणि डीबी पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल) याचा शोध घेतला.

पोलिसांनी एरंडोल बसस्थानकावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये दोन बजाज पल्सर आणि एका होंडा युनिकॉर्नचा समावेश आहे.

Jalgaon Bike Theft Racket Busted
Jalgaon Illegal Sand | अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५७ ब्रास वाळूसह सात वाहने जप्त; १३ जणांविरुद्ध गुन्हे

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल तसेच त्यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीत सहा चोरीच्या दुचाकींचा छडा लावल्याने शहरातील वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news