Jalgaon News | MIDC मध्ये नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेला बसवला डमी उमेदवार, फोटोंनी केलं पितळ उघड

डमी उमेदवार बसवून नोकरीचा प्रयत्न करणाऱ्याची पोलखोल झाली. ४ वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
image of exam paper
डमी उमेदवार बसवून नोकरीचा प्रयत्न करणाऱ्याची पोलखोल झालीfile photo
Published on
Updated on

जळगाव - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरी मिळवण्यासाठी एका उमेदवाराने चक्क डमी उमेदवार बसवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जातील फोटो, प्रत्यक्ष परीक्षेतील फोटो आणि कागदपत्र पडताळणी वेळीचा फोटो यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर ही फसवणूक उघड झाली. चार वर्षांच्या चौकशीनंतर अखेर या उमेदवाराविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जळगाव)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सरळ सेवेने ८६५ पदांसाठी भरती जाहीर केली होती. १७ जुलै २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २० ते २७ ऑगस्ट २०१९ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. राहुल रोहिदास पावरा या उमेदवाराने मु. जे. महाविद्यालयात परीक्षा दिली होती.

image of exam paper
Jalgaon Crime News | बॅटरी चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह २४ तासात जेरबंद

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सन २०२१ आणि नंतर २०२२ मध्ये सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. यादीतील उमेदवारांची २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत कागदपत्रांची छाननी करण्यात आली. याचवेळी राहुल पावरा या उमेदवाराच्या छायाचित्रांमध्ये मोठी तफावत आढळून आली. यानंतर छायाचित्रांची फेरतपासणी करण्यात आली आणि अहवाल मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला.

image of exam paper
Jalgaon news | घराचा दरवाजा उघडून २ लाखांचे मोबाईल चोरले; अल्पवयीन चोरट्याला अटक

प्रयोगशाळेच्या तपासणीत, उमेदवाराने भरलेल्या अर्जावरील फोटो, ऑनलाईन परीक्षा देताना असलेला फोटो आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा फोटो हे तिन्ही वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. याचा सविस्तर एक्झामिनेशन रिपोर्ट मिळाल्यानंतर, अखेर १५ मे रोजी कारवाईचे आदेश आले. त्यानुसार, बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहायक नम्रता पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत राहुल रोहिदास पावरा याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news