

जळगाव: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तब्बल ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई येथून अटक केली आहे.
मेहुणबारे पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०१६ रोजी महिला विनयभंगाचा गुन्हा (रजिस्टर नंबर ९७/२०१६, भादंवि कलम ३५४ (अ)) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांनी फरार आरोपींवर कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्यानुसार आरोपीचा शोध सुरू असताना तो मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करत अंधेरी, मुंबई येथून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ शांताराम पवार, पोकॉ विनोद बेलदार आणि पोकॉ संजय लाटे यांनी ही कामगिरी पार पाडली