Jalgaon Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालक ठार

गणेशपूर पाटणा रोड येथे बिबट्याचा 13 वर्षाच्या मुलावर हल्ला
गणेशपूर पाटणा रोड, जळगाव
गणेशपूर पाटणा रोड येथे बिबट्याने 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला(छाया: नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : चाळीसगाव येथील गणेशपूर पाटणा रस्त्यावर शनिवार (दि.14) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काही लहान मुले रनिंग करत खेळत होते. खेळता खेळता मागे राहिलेल्या रिंकेश गणेश मोरे (राहणार गणेशपूर) या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (दि.14) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेशपूर पाटणा रस्त्यावर काही लहान मुले रनिंग करत खेळत होती. खेळत असतांना रनिंग करत असलेला रिंकेश मोरे हा मागे राहून गेला. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि रिंकेशला ओढत ओढत बाजूच्या शेतात नेले. पुढे निघून गेलेल्या मुलांना रिंकेश दिसला नाही म्हणून त्यांनी रिकेंशचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. याबाबत रिंकेशच्या आई वडीलांना कळविण्यात आले. रिंकेशचा शोध घेत असतांना प्रकाश काशिनाथ पाटील यांना तो शेतात मृत अवस्थेत आढळून आला. वनविभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर अधिकारी यांनी रात्री पंचनामा केला. याचवेळी बिबट्याने एका बकरीचा देखील फडशा पाडल्याचे समजत आहे.

याप्रकारानंतर लहान मुलांना रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडू देऊ नये असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केले आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावून नागरिकांना संरक्षणाची हमी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news