Gujarat bardoli Bus Accident: घरातील कमवता अपघातात गेला; मुलगी नुकतीच झाली होती दहावी पास

जामनेर डेपोचे चालक घनश्याम बरकले यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Gujarat bardoli Bus Accident: घरातील कमवता अपघातात गेला; मुलगी नुकतीच झाली होती दहावी पास
Pudhari
Published on
Updated on

Jamner Bus Driver Accident

जळगाव : गुजरातमधील व्याराजवळ झालेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस व ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात जामनेर डेपोचे चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झाला. घनश्याम हे कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. पत्नी, वृद्ध आईवडिल, दहावी पास झालेली मुलगी, चौथीत शिकणारा मुलगा असा त्यांचा परिवार असून आधारस्तंभ गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जामनेर डेपोचे बस चालक घनश्याम बरकले हे जामनेर सुरत बसवर चालक म्हणून होते. मात्र दुर्दैवाने दोन जून रोजी झालेल्या विचित्र अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ते भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील रहिवासी होते.

Gujarat bardoli Bus Accident: घरातील कमवता अपघातात गेला; मुलगी नुकतीच झाली होती दहावी पास
Jalgaon Police Raid | जळगावात मोठी कारवाई : एकाच दिवशी चार जुगार अड्ड्यांवर छापेमारी; ८ बुकी जेरबंद

घनश्याम यांची कन्या दीपिका घनश्याम बरकले ही नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली होती. तिला 74% गुण मिळाले होते तर मुलगा हा श्लोक घनश्याम बरकडे इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. पत्नी ललिता घनश्याम बरकडे या बारावी पास असून सासर व माहेर हे कुऱ्हे पानाचे याच गावातील आहे.

घनश्याम बरकले हे त्यांच्या घरातील एकमेव कमवते व्यक्ती असल्यामुळे वृद्ध आई-वडिलांनी तरुण मुलगा, पत्नीने तिचा आधार आणि मुलाबाळांनी पितृछत्र गमावलं आहे.

Gujarat bardoli Bus Accident: घरातील कमवता अपघातात गेला; मुलगी नुकतीच झाली होती दहावी पास
Jalgaon Crime | पारोळा तालुक्यात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधम आरोपीला अटक

याबाबत जामनेर डेपोचे मॅनेजर देवेंद्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना अंत्यविधीसाठी नियमानुसार पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरीही मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अपघाती विमा मधून त्यांना रक्कम त्यांच्या खात्यावर जाणार आहे आमच्या परीने आम्ही सर्व सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news