

जळगाव : नरेंद्र पाटील
लाडक्या बहिणींमुळे मतदार यादीतील पारडे वरचढ दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी भावाला दिवाळीची भेट काय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये 74,947 महिला मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जळगाव सिटीमध्ये 16,571 भुसावळ 9,005 जळगाव ग्रामीण 7,789 एवढी मतदार संख्या वाढलेली आहे. सर्वात कमी महिला मतदार संख्या अंमळनेर मध्ये असून 2,936 एवढीच संख्या या ठिकाणी दिसून येते.
राजकारणात वरवर दृष्टीक्षेप टाकला असता पुरुषांचा दबदबा दिसून येतो. काही ठिकाणी महिलांच्या हाती सत्तेच्या चाव्या असल्या किंवा महिला पदाधिकारी विराजमान असल्या तरी त्या ठिकाणी सत्तेचे वर्चस्व हे पुरुषांच्या हाती असते. मात्र यंदाच्या जिल्ह्यातील अकरावी विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या भविष्याची निश्चिती करण्याची दोरी ही जिल्ह्यातील महिला मतदारांच्या हाती असल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.
राजकारणात महिलांना आरक्षण मिळाले असून सत्तेच्या अधिकारी पदी विराजमान होताना सत्तेचे केंद्रीकरण दिसून येते. सत्तेवर विराजमान झालेल्या महिलेच्या श्रीमानांकडे सुत्रे हाती असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला मतदारांची संख्येत वाढ झाली असून चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर या 10 विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सर्वात कमी संख्या अंमळनेर विधानसभा क्षेत्रातील आहे
त्यामुळे येथील महिला मतदार कोणत्या उमेदवारांना पसंती देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लाडक्या बहीणी यंदा दिवाळीची भेट म्हणून कोणत्या भावाला देणार आणि लाडके भाऊ सुद्धा मोठ्या भावाला दिवाळीची भेट काय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या अशी
चोपडा 5431
रावेर 5227
भुसावळ 9005
जळगाव शहर 16571
जळगाव ग्रामीण 7789
अमळनेर 2936
एरंडोल 3636
चाळीसगाव 6099
पाचोरा 6785
जामनेर 6256
मुक्ताईनगर 4397
याप्रमाणे महिला मतदारांची संख्या असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात यंदा ही संख्या वाढलेली आहे. तर एकूण 74,947 आहे. त्यामुळे बहुतांशी विधानसभा क्षेत्रामधील महिलांच्या हाती असल्याने कोणाला निवडून देतील हे स्पष्ट होणार आहे .