Jalgaon crime news | मुरुमाचा ‘मुक्का’ माफिया मालामाल; जळगावात ७७ लाखांचा ‘धुरळा’

प्रशासनाचा वचक संपला? २९ प्रकरणांत मुरुम लुटीचा पर्दाफाश; २१ लाखांची वसुली अद्याप हवेतच; भुसावळात सर्वाधिक कारवाई
Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात वाळूमाफियांपाठोपाठ आता मुरुम माफियांनीही अक्षरशः उच्छाद मांडला असून, पर्यावरणाचे धिंडवडे काढले जात आहेत. १ एप्रिल २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या काळात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत अवैध मुरुम उत्खननाची २९ प्रकरणे समोर आली आहेत. यात तब्बल ७७,३५,०६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी २१ लाख ९ हजार रुपयांची वसुली अद्याप बाकी आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर भागात कारवाईचा धडाका दिसला असला, तरी काही तालुक्यांत मात्र प्रशासनाने मुरुम माफियांना ‘अर्थपूर्ण’ अभय दिल्याची चर्चा रंगली आहे.

भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्ह्यात मुरुमाची सर्वाधिक लूट भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात पाहायला मिळत आहे. भुसावळ (वस्त्रोद्योग मंत्र्यांचा तालुका): येथे १२ प्रकरणांमध्ये २९ लाख ३२० रुपयांचा दंड आकारला गेला. त्यापैकी १८ लाख २ हजार रुपये वसूल झाले असून, १० लाख ९७ हजार रुपये अजूनही थकित आहेत. येथे एका माफियावर गुन्हाही दाखल झाला आहे.

मुक्ताईनगर (केंद्रीय राज्यमंत्र्यांचा तालुका): येथे ५ प्रकरणांत १४ लाख ११ हजार रुपयांचा दंड झाला असून, सर्वाधिक २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. येथे ३ गुन्हे दाखल करून प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

जामनेर आणि जळगावात ‘वचक’ कमी?

जळगाव तालुका: येथे मुरुमाचे एकच प्रकरण समोर आले असून २ लाख २३ हजार रुपयांचा दंड अद्याप एक रुपयाही वसूल झालेला नाही.

जामनेर: येथे एका प्रकरणात २ लाख ३५ हजार रुपयांचा दंड झाला आणि त्याची १०० टक्के वसुली करण्यात आली आहे.

यावल: येथेही एका प्रकरणात १२ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा दंड आकारून तो पूर्णपणे वसूल करण्यात आला आहे.

मुरुम उत्खनन कारवाईचा ‘एक्स-रे’ (१ एप्रिल २५ ते २१ जानेवारी २६)

तालुका

भुसावळ

१२ प्रकरणे

२९,००,३२० दंड रक्कम (रु.)

१८,०२,६४० वसूल रक्कम (रु.)

१०,९७,६८०शिल्लक दंड (रु.)

१२ वाहने / १ गुन्हा

मुक्ताईनगर

०५ प्रकरणे

१४,११,२४० दंड रक्कम (रु.)

११,८१,४४०वसूल रक्कम (रु.)

२,२९,८००. शिल्लक दंड (रु.)

२३ वाहने / ३ गुन्हे

यावल

०१ प्रकरणे

१२,४८,००० दंड रक्कम (रु.)

१२,४८,०००वसूल रक्कम (रु.)

०. शिल्लक दंड (रु.)

१ वाहन

रावेर

०३ प्रकरणे

६,७१,५२० दंड रक्कम (रु.)

२,२३,८४०वसूल रक्कम (रु.)

४,४७,६८०. शिल्लक दंड (रु.)

३ वाहने

अमळनेर

०३ प्रकरणे

५,८५,२२८ दंड रक्कम (रु.)

५,८५,२२८वसूल रक्कम (रु.)

०. शिल्लक दंड (रु.)

३ वाहने

भडगाव

०२ प्रकरणे

३,३७,७०२. दंड रक्कम (रु.)

२,२६,८८४वसूल रक्कम (रु.)

१,१०,८१९. शिल्लक दंड (रु.)

२ वाहने

जळगाव

०१ प्रकरणे

२,२३,८४० दंड रक्कम (रु.)

०. वसूल रक्कम (रु.)

२,२३,८४०. शिल्लक दंड (रु.)

१ वाहन

चाळीसगाव

1 अनधिकृत वाहतूक व उत्खनन प्रकरणांची संख्या

121450 दंडाची रक्कम

121450 वसूल रक्कम

29 अनधिकृत वाहतूक व उत्खनन प्रकरणांची संख्या

7735060 दंडाची रक्कम

5625242 वसूल रक्कम

2109819 शिल्लक रक्कम

1 गुन्हा दाखल

बोदवड चोपडा एरंडोल धरणगाव पारोळा पाचोरा या ठिकाणी मुरूम अवैध उत्खननावर एकही कारवाई झालेली नाही सर्व निरंक आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news