

जळगाव : जिल्ह्यात अकरा फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून 81 केंद्रातून 47667 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पोलीस प्रशासन व शैक्षणिक विभाग हा कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी सज्ज झालेला आहे.जिल्ह्यात 7 भरारी पथके नियुक्त केली आहे
जळगाव जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे यासाठी शिक्षण विभाग प्रशासन व पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक ही घेण्यात आली होती गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आले आहेत अशा 40 केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे.
जिल्ह्याभरातून 81 केंद्रातून 47 हजार 667 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्ह्यात 7 भरारी पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावरील अनेक केंद्रांवर बैठे पथक नियुक्त केले आहेत. सोमवार (दि.11) रोजी इंग्रजी विषयाचा पेपरने सुरुवात झाली आहे. बारावीसाठी 81 परीक्षा गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आले आहेत अशा 40 केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे. परीक्षा होत आहेत.
परीक्षा काळात 500 मीटर परीसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, यानियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारासह आरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्राच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी करण्यात येत आहे. जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे ७ भरारी पथके व बैठे पथक नियुक्त केले आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत व्यक्तींची फेशियल रेकग्निशन सिस्टम व्दारे तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहेत.