

जळगाव : कामाचे बिल काढून घेण्यासाठी दहा टक्के प्रमाणे ग्रामसेवकाने लाच मागितली. धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील ग्राम विकास अधिकाऱ्यास 25000 ची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावने रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदार यांनी शुक्रवार (दि.21) रोजी तक्रार दिली की, तक्रारदार यांनी त्यांच्या गावात गटारीचे 2 लाखाचे व इतर बांधकामाचे 70 हजार रुपयाचे अशी 2 लाख 70 हजार रुपयाचे काम केले होते. आलोसे ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे यांनी तक्रारदार यांचे कडून करण्यात आलेल्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे 1,95,000 व 69,000 असे 2 स्वतंत्र धनादेश दिले. या सदर बिलाची एकूण रक्कम 2 लाख 64 हजार रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांचे कामाची बिले व सदर बिलांचे 2 चेक काढून दिले. या कामाचा मोबदला म्हणून आलोसे ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे (वय 37 वर्ष, खर्दे बुद्रुक) यांनी तक्रादार यांच्याकडे 10 टक्क्याप्रमाणे 25, हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार दिली.
तक्रारीनुसार शनिवार (दि.22) रोजी लाच मागणी पडताळणी मध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना 2 कामाचे 2 लाख 70, हजार रुपयाचे बिल काढून दिले. या कामाचे 10 टक्के प्रमाणे 27 हजार होतात. परंतु तडजोडीनंतर 25 हजार रुपयाची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले. त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून आलोसे यास 25 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. आलोसे याच्या विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक सुरेश पाटील,किशोर महाजॅन, अमोल सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.