

जळगाव : गुड गव्हर्नन्स मध्ये जळगाव जिल्हा हा राज्यात इतर जिल्ह्यांपेक्षा मागे जरी दिसत असला मात्र या जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्हा हा गुड गव्हर्नन्स मध्ये सर्वात पुढे असेल व सुविधा देण्यातही जळगाव जिल्ह्याचा नंबर सर्वाधिक पुढे असेल. येत्या 6 महिन्यात काम पूर्ण करणार असल्याचे टार्गेट ठेवले आहे, असे प्रतिनिधिंशी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील गुड गव्हर्नन्स मध्ये जळगाव जिल्हा प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे मागे पडलेला आहे यामध्ये आरोग्य सेवेचे जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुविधा देण्यामध्ये जळगाव जिल्हा सर्वाधिक पुढे असेल. डाटा एन्ट्रीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल.
याचबरोबर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा पिक विमा हा जवळपास चार लाख आहे तोही वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्वात कमी दीड लाख किसान क्रेडिट कार्ड जिल्ह्यात आहे. ही संख्या वाढवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागणार आहे .आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. जळगाव जिल्ह्यात घरी डिलिव्हरी हे 14 टक्के आहे. ती पण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे. आरोग्याच्या सुविधा ग्रामीण तसेच शहरी लोकांना मिळावे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. घरकुल शहरी तसेच ग्रामीणसाठी उपाययोजना राबविण्यात येत असून त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी ही कामे करण्यात येणार आहेत.
आता चालू शकते किसान क्रेडिट कार्ड यासाठी सचिवांना ग्रामपंचायतीमध्ये एक दिवस बसवण्याचे लवकरच आदेश करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळेच मागे पडलेले गुड गव्हर्नन्स हे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचे टार्गेट ठेवले आहे,असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रतिनिधिंशी बोलताना म्हणाले.