जळगाव : अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी

25 बालकांची होणार शस्त्रक्रिया
jalgaon
अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी

जळगाव : जिल्हा रुग्णालय येथे 18 व 19 जुलै रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे मार्फत मोफत 2Dइको शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या शाळा व अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी हृदयरोगतज्ञ डॉ. श्रीनिवास व डॉ. सोनिया कारापूरकर ( interventional pediatric cardiologist ) ही तपासणी यांच्या मार्फत करण्यात आली.

यातील 29 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून 25 बालकांचा पाठपुरावा घेण्यात येणार आहे तर 37 बालकांची स्थिती सर्वसाधारण आहे व औषधपचार करीता 2 मुले संदर्भित आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news